वटवृक्षाचं उन्मळणं केवळ भास
मृत्यू, ते अनादी सत्य, मरण, मौत, दिगंंतराची यात्रा, अनंताचा प्रवास... म्हणजे काय? काय? काय?... मरण येणं म्हणजे शरिराची चेतना अस्तंगत होणं. चेतनेचा निर्झर क्षणात पार्थिव होणं. उरलेल्या पार्थिवावर केवळ आणि केवळ विधी - संस्कारांचे उपचार करणं. क्षणात होत्याचं नव्हतं होणं. सगळंकाही इथेच जस्सच्या तस्सं सोडून जाणं. जीवन गाण्याचे शब्दच निशब्द होणं. वर्तमानाचा इतिहास होऊन जाणं किंवा स्मृती होऊन जाणं. लढता - लढता मृत्यूनं हौतात्म्याचं अमरत्व बहाल करणं. सगळ्याच कवच - कुंडलांचं निरुपयोगीत्व सिद्ध होणं. सुटले, सुटली म्हणून निश्वासांचंं उरणं. मुसमुसणार्या डोळ्यांमध्ये अश्रुंचं गोठणं. ’मी जाता राहिल काय...’ या जगरहाटीची जाणिव करुन देणं. जन्मभराच्या धावपळीतून अखेरचा तो निवांत, शांत क्षण मिळवणंं. नियतीशी उभा दावा मांडणार्यानं निशस्त्र सम्राटाप्रमाणे सन्मानानंं त्याच नियतीला शरण जाणं. डाव मोडणं कि अर्ध्यावर डाव सोडणंं. भौतिकाची दगदग संपवून मोक्ष मिळवणं. काय असतं मरण? तुमचंं, आमचं, त्यांचंही अगदीच सारखं असतंं?... रणांगणावर धारातिर्थी पडलेल्याचं तिर्थ होतं. अखेरच्या क्षणीही राष्ट्रध्वजाचं कवच कुं...